|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » भारतीय तरूणीच्या हातातील फलकाचे पाक डिफेन्सकडून मॉर्फिंग,ट्विटरकडून कारवाई

भारतीय तरूणीच्या हातातील फलकाचे पाक डिफेन्सकडून मॉर्फिंग,ट्विटरकडून कारवाई 

ऑनलाईन  / मुंबई  :

 

बॉर्डरच्या सोबतीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील पाकिस्तान भारताविरूद्ध काही नकारात्मक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. एका भारतीय मुलीचा फोटो मॉर्फ करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा एक प्रकार नुकताच उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवलप्रीत कौर या मुलीने भारताच्या संविधानाच्या काही मुल्यांचा प्रसार करणारे प्लेकार्ड हातामध्ये घेऊन एक फोटो क्लिक केला होता. तो तिने सोशल मिडियावरही टाकला. मात्र काही दिवसांनी त्या प्लेकार्डावरील संदेश बदलला आहे हे कवलप्रीतच्या लक्षात आले. तिने ट्वटिरवर या अकाऊंटबाबत माहिती दिली. कवलप्रीतने टॅग केलेले हॅन्डल हे पाकिस्तानच्या डिफेन्स विभागाचं व्हेरिफाईड मार्क केलेले अकाऊंट होते. ट्वटिरनेही त्यावर कडक कारवाई करत ट्वटिरनें पाकिस्तान डिफेन्सचे अकाऊंट सस्पेंड केले आहे.