|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » लिंग बदलासाठी महिला पोलिस कोन्स्टेबलची सुट्टी

लिंग बदलासाठी महिला पोलिस कोन्स्टेबलची सुट्टी 

ऑनलाईन टीम / बीड :

जिल्हा पोलीस दलातील एक 27 वषीय महिला लिंगबदलाच्या निर्णयावर ठाम असून, येत्या पंचवीस तारखेला तिच्यावर जे.जे.रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. बीड पोलीस दलातील एका महिला पोलिसाने आपण पुरुष असल्याचे सांगत ,लिंग बदल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी तिने रजेसाठीही अर्ज केला आहे.

मात्र अद्याप या अर्जावर महासंचालकाने कुठलाही निर्णय घेतला नाही. सदर महिला पोलीस लिंगबदलावर ठाम असून , नौकरीची पर्वा न करता, लिंग बदल करण्याच्या निर्णयावर ती ठाम आहे. मुंबईत कायदा तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर ,तिने हा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात तिच्यावर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. तिच्यावरील उपचाराच्या खर्चाची जबाबदारी काही नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली आहे.