|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिह्यात 3 काथ्या केंद्रांची होणार स्थापना

रत्नागिरी जिह्यात 3 काथ्या केंद्रांची होणार स्थापना 

रत्नागिरी / प्रतिनिधी

राज्य शासनाने कोकणात क्वायर क्लस्टर स्थापन करण्यासाठी खास योजना आखली आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळातर्फे ही योजना आखण्यात आली आहे. रत्नागिरी जिह्यात गणपतीपुळे, पावस आणि संगमेश्वर येथे ही केंदे सुरु करण्यात येतील, असे लघुउद्योग विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

यापूर्वी सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ येथे 2016 मध्ये काथ्या केंद सुरु झाले हेते.  महिलांनी दोऱया व राजू (जाड दोऱया) बनवाव्या म्हणून त्या ठिकाणी काथ्या उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था झाली होती. 100 महिलांना इलेक्ट्रीक चरखा येथे देण्यात आला होता. 15 रुपये प्रतिकेलो दराने उत्पादनाची किंमत देण्याचे ठरवण्यात आले होते. प्रत्येक महिला दरदिवशी 15 केलो एवढय़ा दोऱया व राजू बनवत असल्याचे लघुउद्योग विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांनी सांगितले.

2 किलो काथ्यापासून 1 चटई बनवण्यात येते. ही चटई 250 रुपयाला विकली जाते. 10 हजार नारळ सोलल्यानंतर 1 टन सोडणे मिळतात आणि 2 टन तुसे मिळतात. ही तुसे फलोत्पादन आणि पुष्पोत्पादनासाठी वापरली जातात. परदेशातून अशा तुसाला मोठी मागणी आहे. 10 हजार 500 एवढे प्रतिहेक्टर एवढे नारळ उत्पादन महाराष्ट्रात होत असते, असे ते म्हणाले. नारळ्य़ाच्या काथ्याला चांगली तन्य क्षमता असते. बुरशी आणि दमट हवेपासून बचाव करण्याची काथ्याची उच्च क्षमता आहे. काथ्यापासून चटई, हस्तकलेच्या वस्तू, पांघरुणे, पर्यावरणस्नेही वस्त्र प्रावणे, छत्र्या, बॅग बनवण्यात येतात. पर्यावरणस्नेहीतेबरोबर ग्रामीण उद्योगाला ते पुरक ठरेल, असे सांगण्यात आले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, टाकाऊ वस्तूंपासून संपत्ती बनवण्याच्या मुद्यावर आम्ही काम करत आहोत. कुडाळ येथे राज्यातील पहिले काथ्या केंद्र सुरु करण्यात आले. यापूर्वी खत व इंधनासाठी सोडणांचा वापर केला जातो किंवा ती फेकून दिली जातात. उद्योगासाठी ही सोडणे विकली जाऊ शकतात.

खासगी उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत

ते म्हणाले, राज्यात 32161 हेक्टरवर नाराळाची लागवड करण्यात आली आहे.   यातील बरीचशी कोकणातच आहेत. सिंधुदुर्ग जिह्यात 16609 हेक्टर जमीन नारळाखाली आहे. सर्वाधिक नारळ लागवड रायगड जिह्यात झाली आहे. तेथे 5974 हेक्टर जमीन नारळ लागवडीखाली आहे. याच पिकाखाली रत्नागिरी जिह्यात 5945 एवढी जमीन आहे. ठाणे आणि पालगड जिह्यात 3633 जमीन नारळाखाली आहे. खासगी उद्योजकांनी काथ्यापासून चांगल्या वस्तू बनवण्यासाठी कारखाने सुरु करावेत. त्यामुळे नारळ उत्पादकांना चांगला दर मिळेल.

कोकणात 12 काथ्या केंद्रे सुरू करणार

राज्य सरकारच्या चांदा ते बांदा योजनेत 12 काथ्या केंद्रे कोकणात सुरु करण्याचे ठरवले आहे. केरळ राज्य काथ्या यंत्र उत्पादन कंपनीशी समझोता करार करण्यात आला आहे. या संस्थेने यंत्रे आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात द्यावे, असे या करारात ठरले आहे, असे लघुउद्योग विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड म्हणाले.

उर्वरित केंद्रे अन्य जिल्हय़ात उभारणार

रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर, पावस, गणपतीपुळे येथे अशी केंद्रे उभारण्याचे ठरवण्यात आले आहे. बाकी केंद्रे अन्य जिह्यात उभारण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्राला 45 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. कुडाळ येथे चटई उत्पादन करण्याचे केंद्र स्थापित करुन शासकीय रुग्णालयांना आणि आस्थापनांना ती देण्याची योजना करण्यात आली आहे.

Related posts: