|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » सुमित नागल उपांत्य फेरीत

सुमित नागल उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

येथे सुरू असलेल्या बेंगळूर खुल्या एटीपी चॅलेंजर पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा बिगर मानांकित टेनिसपटू सुमित नागलने स्लोव्हेनियाच्या टॉपसिडेड कॅव्हीसिकचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत एकेरीची उपांत्यफेरी गाठली. उपांत्य फेरीत सुमित नागलची गाठ भारताच्या युकी भांबरीशी होणार आहे. युकीने उपांत्य पूर्वफेरिच्या लढतीत भारताच्या पी. गुणेश्वरनवर 7-5, 6-2 अशी मात केली. एक लाख डॉलर्स एकूण बक्षिस रक्कमेच्या या स्पर्धेत चीन तैपेईच्या यांगने फ्रान्सच्या इस्कोफियरचा 6-4, 6-4, ब्रिटनच्या क्लार्कने क्रोयेशियाच्या पॅव्हिकचा 6-2, 4-6, 7-6 असा पराभव करत उपांत्यफिरी गाठली आहे.