|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » 26/11 मुंबई हल्ल्यातील पीडितांना मोदींकडून श्रद्धांजली

26/11 मुंबई हल्ल्यातील पीडितांना मोदींकडून श्रद्धांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

शहिदांचे बलिदान कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ग्वाही दिली. ‘मन की बात’मधून मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली.

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 9 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षानंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत. या हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या मनावरील आघात अद्याप कायम आहे. हल्ला झालेल्या बहुतेक ठिकाणांवर आज मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

मन की बातमध्ये बोलताना मोदी म्हणाले, 26/11 हा आपला संविधन दिवस आहे. पण देश हे विसरू शकत नाही की, नऊ वर्षांपूर्वी 26/11 लाच दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. देश त्या शूर नागरिक, पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक प्रत्येकाला स्मरण करतो, त्यांना नमन करतोय. ज्यांनी आपला प्राण गमावला. दहशतवादाने जागतिक मानवतेला आव्हान दिले आहे. ते मानवीय शक्तींना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी फक्त भारतच नव्हे तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींना एकजूट होऊन दहशतवादाला पराभूत करावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Related posts: