|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने,तर भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने,तर भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यामुळे विधान परिषदेतील एक जागा रिक्त झाली. भाजपकडून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्मयता होती. मात्र शिवसेनेचा राणेंच्या उमेदवारीला विरोध होता. याशिवाय राणे यांना उमेदवारी दिल्यास इतर सर्व पक्ष त्यांच्याविरोधात एकत्र येण्याची दाट शक्मयता होती. त्यामुळेच प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली. प्रसाद लाड यांचे सर्व पक्षांमधील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाड यांना उमेदवारी दिल्यास इतर पक्षातील आमदारांकडूनही त्यांना मते मिळू शकतात, याचा विचार करुन त्यांना उमेदवारी देण्यात आली.