|Sunday, September 22, 2019
You are here: Home » विविधा » अबब! तरूणाच्या पोटातून निघाले 263 नाणी आणि 12 ब्लेड

अबब! तरूणाच्या पोटातून निघाले 263 नाणी आणि 12 ब्लेड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

मध्यप्रदेशातील रिवामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे.रिवामधील संजय गांधी मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी एका युवकाच्या पोटातून नाणी,खिळे आणि चेन काढले आहेत.

शुक्रवारी डॉक्टरांच्या एका टीमने 32 वर्षीय तरूणाच्या पोटातून 263 नाणी,10 ते 12 शेव्हिंग ब्लेड ,काचेचे तुकडे,लोखंडी साखळीशिवायही अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत. मध्यप्रदेशमधील सतना जिह्यातील सोहावल येथे राहणाऱया मकसून या तरूणाला शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.गेल्या तीन महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास जाणवत होता.त्यानंतर त्याची तपासणी सुरू करण्यात आली आणि शुक्रवारी ऑपरेशन करण्यात आले. या तरूणाच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुलाला धातूच्या वस्तू खाण्याची सवय लागली होती.त्यामुळे तो धातूसदृश्य वस्तू खात होता.लहापनापासूनच तो लपून -छपून नाणी आणि इतर लोखंडी वस्तू खात होता.