|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अंगणवाडीतील आहाराच्या तपासणीचे आदेश

अंगणवाडीतील आहाराच्या तपासणीचे आदेश 

प्रतिनिधी /सोलापूर :

जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये दिला जाणार आहार निकृष्ठ असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने या आहाराची तपासणी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडून करावी, असे आदेश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी समिती सदस्या मंगला वाघमोडे, रेखा राऊत, रोहिणी ढवळे, लक्ष्मी आवटे, मंजुळा कोळेकर, संगीता डोईफोडे, सुरेखा काटगाव, ताराबाई पाटील यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. गिरी, प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रत्येक प्रकल्पातील एक आंगणवाडी आदर्श करण्यासंदर्भात सभेत चर्चा झाली. ज्या अंगणवाडय़ांच्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्यांची प्राधान्याने दुरुस्ती करण्याच्याही सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या. किशारेवयीन मुलींना आणि महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंब नियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देणे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रकल्पांसाठी 75 हजार रुपयाची तरतूद करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाचा आढावा घेण्यात आला. 40 ते 45 अंगणवाडी सेविकांचे मानधन तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे समोर आले. या तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्यासाठी 3 व 4 डिसेंबर रोजी दोन दिवस शिबीर आयोजित करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आल्या. अंगणवाडीतील बालकांना पुरवठा केल्या जाणारा आहार निकृष्ठ असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Related posts: