|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱयांवर फौजदारी

माहिती अधिकाराचा गैरवापर करणाऱयांवर फौजदारी 

प्रतिनिधी /सांगली :

गेल्या काही दिवसापासून माहिती अधिकाराचा गैरवापर करून अधिकाऱयांना त्रास देणाऱया माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्यावर थेट फौजदारी करा, असा आदेश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. गेल्या काही दिवसापासून सातत्याने कृषि विभाग आणि इतर विभागातील अनेक अधिकाऱयांना या तथाकथित कार्यकर्त्यांनी  छळले आहे. त्यामुळे अशा काही कार्यकर्त्यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपणच फौजदारी दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा विकास व समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या सभेत बोलताना, त्यांनी हे आदेश दिले. खासदार संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱया या समितीच्या बैठकीसाठी खास राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यावेळी कृषि विभागातील योजनांचा आढावा घेत असताना माहिती अधिकार हा विषय आला. त्यावेळी स्वतः राज्यमंत्री यांनी आपण याबाबत काय सांगतो ते स्पष्ट ऐका आणि त्याची अंमलबजावणी करा असे सांगितले.

सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या काही दिवसापासून माहिती अधिकारांचा गैरवापर करणारे अनेक तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. या तथाकथित माहिती अधिकारांचा वापर करणारे कार्यकर्ते विनाकारण प्रशासनातील अधिकाऱयांना त्रास देत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आम्ही इस्लामपूर येथील अशा काही तथाकथित माहिती अधिकाऱयांची माहिती एकत्रित केली आणि या 20 माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा ज्या विषयाशी काही देणेघेणे नाही, किंवा ज्या विषयातील माहितीशी त्यांचा काहीही संबंध नाही, अशी  माहिती मागण्यासाठी हे तथाकथित कार्यकर्ते सर्व विभागात जावून माहिती अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे पुढे आले  आहे. त्याबरोबरच हे माहिती कार्यकर्ते  अधिकाऱयांना त्रास देत आहेत. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात थेट फौजदारी दाखल केली आहे.

Related posts: