|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दीड वर्षात बाजार समितीतील 36 हजार शेतकयांनी घेतला पूर्णब्रह्म योजनेचा लाभ

दीड वर्षात बाजार समितीतील 36 हजार शेतकयांनी घेतला पूर्णब्रह्म योजनेचा लाभ 

वार्ताहर

सोलापूर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या 1 रुपयातील ” पूर्णब्रह्म ” योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. योजना सुरु झाल्यापासून 1 वर्ष पाच महिन्यात सुमारे 36 हजार 250 शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला असून या भोजनामुळे शेतक-यांनी समाधानाची ढेकर दिली आहे. बाजार समितीने या योजनेला आणखी बळ देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

   2 जून 2016 रोजी या योजनेला सुरुवात ककरण्यात आली. बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणा-या शेतक-यांना सोलापुरात आल्यानंतर दररोज बाहेरचे भोजन परवडत नाही. त्याना अतिरिक्त खर्च होऊ नये आणि जेवणाअभावी त्याचे आभाळ होऊ नये म्हणून पूर्णब्रह्म योजना सुरु करण्यात आली . बनशंकरी बचत गटाच्या अनुराधा कुलकर्णी यांना हे भोजनालय चालविण्यास देण्यात आले आहे. बाजार समिती 19 रुपये,आडते 10 रुपये आणि शेतकरी 1 रुपया असे 30 रुपयांचे जेवणाच्या थाळीचे नियोजन आहे. बाजार समितीतर्फे आडत्यांना कुपन देण्यात आले आहेत. तेथून शेतकरी नाव टाकलेले दोन प्रति कुपन घेऊन भोजनालयात येतात आणि कुपन व 1 रुपया देऊन भोजन करतात. एक प्रत बाजार समितीला तर एक प्रत उपहारगृह चालकाला देण्यात येते.    दररोज किमान 30 आणि जास्तीत जास्त 80 ते 90 शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. सिझन आणि आवक जास्त असताना जास्त शेतकरी भोजन करतात. त्यासाठी कधी-कधी रात्री 11 वाजेपर्यंत भोजनालय चालू ठेवले जाते. दररोजची भोजनालयाची  वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 अशी असून यावेळेत शेतक-यांना जेवण देण्यात येत असल्याचे अनुराधा कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Related posts: