|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सध्याचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी, मा.आ. दिपकआबांचा हल्लाबोल

सध्याचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी, मा.आ. दिपकआबांचा हल्लाबोल 

प्रतिनिधी /सांगोला :

सध्याचे सरकार हे शेतकरी, शेतमजुर, कामगार, गोरगरीब जनता आदींसह समाजातील इतर घटकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवुन सबका साथ सबका विकास चा नारा करुन सत्तेवर आले आहे. पण सत्तेवर येवुन तीन वर्षाचा काळ उलटुन गेला तरीही जनतेची कुठलीही विकासाची कामे झाली नसुन महागाई मात्र गगनाला भिडली असल्याचे चित्र आहे. केंद्रातील सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी सारख्या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय शेतकरी, कामगार, व्यावसायिक व नोकरदार वर्गांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.  निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देवुन जनतेची घोर फसवणुक करुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम सध्याच्या सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकऱयांची कर्जमाफी असो की मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न असो. एकीकडे वाढलेली महागाई तर दुसरीकडे अच्छे दिनाचे स्वप्न या सर्व गोष्टीचा विचार केल्यास सध्याचे सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केला.

सांगोला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल गुरूवार दि. 30 नोव्हे. रोजी सकाळी 11.30 वाजता शहरातील म. फुले चौकातुन या हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात झाली. तेथुन स्टेशन रोड, नेहरु चौक, नगरपालिका, जयभवानी चौक, कचेरी रोड मार्गे तहसिल कार्यालयासमोर रॅली काढण्यात आली. या हल्लाबोल आंदोलनामध्ये माजी जि.प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, सोलापुर जिल्हा राष्ट्रवादीच्या निरीक्षक निर्मलाताई बावीकर, महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, सांगोला तालुका राष्ट्रवादीचे निरीक्षक दिपकदादा वाडदेकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, महिला तालुकाध्यक्ष सखुताई वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष व नगरसेवक चेतनसिंह केदार-सावंत, जि.प. सदस्य अनिल मोटे, स्वाती कांबळे, डॉ. पियुष साळुंखे-पाटील, जैनवाडीचे सरपंच ऍड. दिपक पवार, नगरसेवक सतीश सावंत, जुबेर मुजावर, पुजा पाटील, भामाबाई जाधव, सुनिता खडतरे, अनुराधा खडतरे, मनोज उकळे, चंचल बनसोडे, शहाजी हातेकर, विजयदादा येलपले, विजय पवार, विनायक मिसाळ, पोपट खाटीक, रियाज मुजावर  यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते.

Related posts: