|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात एटीएमला आग ,लाखोंची रोकड जळून खाक

पुण्यात एटीएमला आग ,लाखोंची रोकड जळून खाक 

ऑनलाईन टीम / पुणे :

इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआसीआय बँकेच्या एटीठमलागुरूवारी मध्यरात्री आग लागली.या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रूपयांची रोकड जळून खाक झाली आहेत.

पुण्यातल्या वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे.मध्यरात्री या इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि पाहता पहाता या आगीने एटीएम सेंटरलाही आपल्या कवेत घेतले. ही आग रात्रभर धुमसत होती.अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे,एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे.ही रक्कम नेमकी किती होती,याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, गुरूवारीच या एटीएममध्ये पैसे भरले हेते,त्यामुळेआगीत लाखोंची रक्क्म खाक झली असावी,अशी माहिती स्थानिकांनी दिली.