|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेचे सर्जिकल स्ट्राईक

मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेचे सर्जिकल स्ट्राईक 

ऑनलाईन टीम / मुंबई:

मुंबईत परप्रांतीयांच्या मुद्यावरून काँग्रेस आणि मनसेमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरूपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’,असा धमकीचा ईशाराच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली आहे.

आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.मात्र हा हल्ला कोणी केला,याबाबत चर्चा सुरू असताना ,स्वतः संदीप देशपांडे यांनी ट्विट करून,त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेत मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि अन्य चार जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी मनसेवर टीका केली होती.मनसेच्या गुंडांनी परत मारा खल्ला,असे खोचक ट्विट त्यांनी केले आहे.

 

 

Related posts: