|Monday, August 19, 2019
You are here: Home » leadingnews » भविष्यात नव्या पद्धतीनुसार सर्जिकल स्ट्राईक : लष्करप्रमुख

भविष्यात नव्या पद्धतीनुसार सर्जिकल स्ट्राईक : लष्करप्रमुख 

पुणे / प्रतिनिधी :

सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती करण्यास लष्कर सज्ज आहे. मात्र, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सर्जिकल करण्याऐवजी या स्तरावर भविष्यात नवीन पर्यायांचा विचार करण्यात येणार असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले.

सैन्यदलातील ‘ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर’च्या बढतीचे गेली दहा वर्षे प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लागले असून, येत्या 1 जानेवारी 2018 पासून बढत्यांच्या अंमलबजावणीस सुरूवात होणार आहे. यात 1 लाख 40 हजार ज्युनिअर कमांडिंग अधिकार्‍यांच्या बढत्यांसह 457 नवीन सुभेदार मेजर पदे भरण्याचाहि समावेश राहणार असल्याची माहितीहि त्यांनी या वेळी दिली. 

राष्ट्रीय सुरक्षा विÍलेषक व पत्रकार नितीन गोखले यांच्या ‘सिक्युरिंग इंडिया-द मोदी वे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. वायुदल प्रमुख पी.व्ही.नाईक लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.आर.सोनी, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. 
रावत म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकसाठी लष्कर सदैव सज्ज आहे. मात्र, आता नेहमीच्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक करण्याचा मानस नाहि. त्याऐवजी नवीन पया\याचा विचार करण्यात येत आहे. नव्या पद्धतीनुसार सर्जिकल स्ट्राईक केल्यास भविष्यात अधिक यश मिळू शकेल. चीनच्या सीमेवर दुर्गम भागात पोहोचण्याकाfरता मोठय़ा प्रमाणात जलद गतीने पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात येत असून रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे. त्यामुळे सैनिक, लष्करी वाहने, हत्यारे यांची हालाचाल वेगाने करता येऊ शकेल.