|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » दोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकत नाही : सुप्रिम कोर्ट

दोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकत नाही : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुन्हेगारी प्रकरणांतील दोषी व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावे,या मागणीची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे. तसेच दोषींना पक्षप्रमुख होण्यास रोखू शकत नसल्याचे देखील न्यायालयाने यावेळी सांगितले.

 ‘अशा प्रकरणांत सरकार किंवा संसदेने निर्णय घेतले पाहिजेत.गुन्हेगारी प्रकरणांतील दोषींना पक्षप्रमुख होण्यापासून रोखू शकता का?,हे स्वातंत्र्यावर बंधन लादल्यासारखे नाही का? कुणालाही राजकीय विचार मांडण्यापासून न्यायालय रोखू शकतो का ,असे सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केले आहे. गुह्यांत दोषी ठरलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांचे प्रमुख होण्यापासून रोखण्यात यावे,अशा मागणीची याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी न्यायालयात दाखल केली होती.त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा,न्या.डी.वाय. चंद्रचूड आणि ए.एम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळत दोषींना पक्षप्रमुख होण्यास रोखू शकत नसल्याचे सांगितले.