|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आरके नगर पोटनिवडणूक लढविणार अभिनेता विशाल

आरके नगर पोटनिवडणूक लढविणार अभिनेता विशाल 

चेन्नई

 तमिळ अभिनेता विशाल चित्रपटसृष्टीत होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात उघडपणे बोलत आला आहे. परंतु यावेळी त्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आरके नगर मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा विशाल याने केली. जे. जयललिता यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात 21 डिसेंबर रोजी मतदान होईल. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवेन. पोटनिवडणूक लढविण्याचे कारण अर्ज दाखल केल्यावर जाहीर करेन असे विशालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.