|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » उद्योग » गूमो – युनीग्लोब यांच्यात पर्यटनासाठी भागीदारी

गूमो – युनीग्लोब यांच्यात पर्यटनासाठी भागीदारी 

प्रतिनिधी / मुंबई

जगातील सर्वांत मोठी सिंगल ब्रॅण्ड पर्यटन फ्रँचायझी युनीग्लोब आणि भारतातील अग्रगण्य पर्यटन तंत्रज्ञान कंपनी गूमो यांनी धोरणात्मक भागीदारी करार केला. एक पारंपरिक ट्रव्हल एजंट नेटवर्क आणि एक ऑनलाईन मंच यांच्यात अशा प्रकारचा करार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. युनीग्लोब ट्रव्हल दक्षिण आशियाच्या भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये एकूण 60 ठिकाणी एजन्सीज असून 3500 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक विक्री आहे. या भागीदारी करारामुळे युनिग्लोब फ्रँचायजी आणि गूमो यांच्यात दृढ सहयोग प्रस्थापित होणार असून, गूमो मंचावर आलेल्या ग्राहकांना युनीग्लोब फ्रँचायझीच्या रूपाने एक विश्वासू एजंट लाभणार आहे.

या एजंटशी ग्राहक प्रत्यक्ष (ऑफलाईन) आपल्या गरजांबद्दल चर्चा करू शकतील. दक्षिण आशियातील विस्तारलेल्या पर्यटन बाजारपेठेतील आपले अनेकविध चॅनलमार्फत असलेले अस्तित्व विस्तारण्यासाठी युनीग्लोब आणि गूमो दोहोंना हा करार एक आदर्श असा पाया घालून देईल.

 गूमोच्या पर्यटन उत्पादनांच्या समुहामध्ये यामुळे अधिक विविधता येईल. ग्राहक ही उत्पादने ऑनलाइन किंवा विशेष एजंटच्या माध्यमातून घेऊ शकतील.

या भागीदारीबद्दल गूमोचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण गुप्ता म्हणाले, “पर्यटनाकरता बुकिंग करण्यासाठी आपल्याला सर्वांत सोयीस्कर वाटणारे माध्यम निवडता येणे हा ग्राहकांचा हक्क आहे. आम्ही युनीग्लोबशी केलेल्या भागीदारीतून हे पर्याय देण्याचाच वायदा करत आहोत. ग्राहकांना यामुळे एकाच ठिकाणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पर्यटन उत्पादने घेता येतील आणि त्यांना अन्यत्र कुठे बघावेच लागणार नाही.’’