|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » बाजारातील घसरणीला अखेर विश्रांती

बाजारातील घसरणीला अखेर विश्रांती 

बीएसईचा सेन्सेक्स 37, एनएसईचा निफ्टी 6 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

गेल्या सत्रात सलग घसरण झाल्यानंतर या सत्राची सुरुवात मात्र तेजीने झाली. दिवसातील तेजीच्या दरम्यान बाजारात नफा कमाई दिसून आली. निफ्टी 10,125 च्या जवळपास बंद झाला. सेन्सेक्सही वधारत 32,870 च्या आसपास बंद झाला. बुधवारी पतधोरण जाहीर होणार असल्याने बँक समभागात घसरण झाली. दिवसातील 50 अंशाची तेजी निफ्टीने गमावली तर सेन्सेक्स 150 अंशाने कमजोर झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 37 अंशाच्या तेजीने 32,870 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 6 अंशाने वधारत 10,1280 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅम समभागातही नफा कमाई दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांच्या घसरणीने 16,742 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारत 19,750 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरत 17,925 वर बंद झाला.

बँकिंग, वाहन, औषध, रिअल्टी, ऊर्जा कंपन्यांच्या समभागात विक्री दिसून आली. बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी कमजोर होत 25,075 वर बंद झाला. निफ्टीचा खासगी बँक निर्देशांक 0.6 टक्के, वाहन निर्देशांक 0.25 टक्के, औषध निर्देशांक 0.4 टक्क्यांनी कमजोर झाला. आयटी, एफएमसीजी, धातू, पीएसयू बँक, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू समभागात मात्र खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

इन्फोसिस, इंडियाबुल्स हाऊसिंग, एचसीएल टेक, हिंडाल्को, झी एन्टरटेनमेन्ट, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनि, एचडीएफसी, टाटा स्टील 2.8-1 टक्क्यांनी वधारत बंद झाले. यूपीएल, भारती इन्फ्राटेल, कोल इंडिया, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेन्ट्स, सन फार्मा, रिलायन्स इन्डस्ट्रीज, मारुती सुझुकी 2.6-0.9 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बायोकॉन, पी ऍण्ड जी, जिलेट इंडिया, अल्केम लॅब 15-2 टक्क्यांनी वधारले. अशोक लेलँड, जीई टी ऍण्ड टी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ग्लेनमार्क 3-2.2 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात निटको, शैली इंजिनियरिंग, आयनॉक्स विंड, ज्युबिलंड इन्डस्ट्रीज, ला ओपाला 20-9.4 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स नेव्हल, नेक्टर लाईफ, व्हीआयपी क्लोदिंग, एपीएल अपोलो, मनपसंद बेव्हरेजीस 8.9-5.8 टक्क्यांनी घसरले.

Related posts: