|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मटका चालविणारे चार तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार

मटका चालविणारे चार तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार 

प्रतिनिधी/ सातारा

वडूज पोलीस ठाणेच्या हद्दीत  मटका जुगार चालविणारे टोळीचा प्रमुख जयवंत बजरंग जाधव (वय 34), टोळी सदस्य : मयुर सोपान भोसले (वय 30), पृथ्वीराज बाळासा चव्हाण (वय 32) सर्व रा. वडूज हे  बेकायदा मटका जुगार चालवत होते. त्यांना चार तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून अटक करून सुधारणेची संधी देवूनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होता. जनतेमधून त्यांचेवर कडक कारवाई करणेकरिता मागणी होत होती. त्यामुळे त्यांचेकडून वडूज हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणून या टोळीतील प्रस्तावित तीन इसमांना हद्दपार करणेबाबत संदीप पाटील, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक सातारा यांचेकडे वडूज पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यांना संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्यवये खटाव, माण, कोरेगाव, कर्हाड तालुका (जि. सातारा) या चार तालुका हद्दीतून सहा महिने कालावधीकरिता हद्दपारीचा आदेश केला आहे.

 आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाचे आत त्यांना हद्दपार केले. हद्दपार गेले पाहिजे असाही आदेश केला आहे. या कारवाईचे सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिह्यात अशाच प्रकारे समाजाचे दहशत पसरविणार्या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्या टोळ्यांचे तडीपारची कारवाई सुरूआहे.

Related posts: