राज्यात पाऊस ;’ओखी’मुळे शाळांना सुट्टी

ऑनलाईन टीम / मुंबई :
ओखी वादळाच्या तडाख्य़ामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे.वादळामुळेकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई,कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. तर आज सकाळपासून मुंबईसह काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.
पुढील 48 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महापरिर्निर्वाणदिनसाठी पोहोचलेल्या अनुयायांनी चौपाटीवर जाऊ नये, अशी विनंती प्रशासनानी केली आहे. ओखी वादळाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगड जिह्यांतील शाळांना सुटी देण्यात आली आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आजच दुपारी 12.43 वाजता 4.35 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.