|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » एक्सप्रेस वेवर अफवांचा पाऊस

एक्सप्रेस वेवर अफवांचा पाऊस 

ऑनलाईन टीम / लोणावळा : 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आखी वादळामुळे कोकण किनारपट्टी व मुंबई भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या वादळामुळे विविध भागात हवा सुटली असून पाऊस पडत आहे. याच पार्श्वभुमीवर सोशल मिडीयावर एक व्हिडीओ वायरल करत एक्सप्रेस वेवर गारांचा पाऊस पडत असल्याची अफवा पसरवली जात आहे. मोठ्या प्रमाणात गारा पडत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ एक्सप्रेस वेवरील नसून कुठला तरी बाहेरचा असल्याची माहिती एक्सप्रेस वेच्या नियंत्रण कक्षाने तसेच आयआरबीच्या सुरक्षा विभागाने दिली आहे. नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related posts: