|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘वन प्लस’चे स्टार वॉर्स लिमिटेड एडीशन बाजरात

‘वन प्लस’चे स्टार वॉर्स लिमिटेड एडीशन बाजरात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय बाजारपेठेत वन प्लस 5 हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन स्टार वॉर्स लिमिटेड एडिशनच्या माध्यमातून नवीन स्वरूपात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

नावातच नमूद असल्यानुसार स्टार वॉर्स या लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या थीमचा यात उपयोग करण्यात आला आहे.बंगळुरू शहरात सुरू असणाऱया कॉमिक कॉन 2017 या कार्यक्रमात संबंधीत स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली,याचे मुल्य तसेच अन्य ऑफर्स अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याच्या प्रतिमेचा टीझर लाँच करण्यात आला आहे.15 डिसेंबर रोजी स्टार वॉर्स ः द लास्ट जेडी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.या पार्श्वभूमीवर वन प्लश 5 टी हा स्मार्टफोन मॉडेल या चित्रपटावय आधारित आवृत्ती लाँच करण्यात आल्याचे मानले जात आहे.

 

 

 

Related posts: