|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » ‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती

‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने विविध क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजली आता सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणार आहे, असे सांगण्यात आले.

सौर ऊर्जा क्षेत्रात जास्तीत जास्त स्वदेशी उपकरणांचा वापर व्हावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला. प्रत्येक घरात वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेच्या उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. सरकारच्या सौभाग्य योजनेला हातभार लावण्यात येणार आहे. सौर उत्पादनांची निर्मिती देशातच करण्यात येणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारे गुणवत्तेसाठी तडजोड करण्यात येणार नाही. चिनी सोलार पॅनेलबरोबर दरयुद्ध छेडण्याचा कोणताही विचार नाही, असे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले. ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या यशस्वी विक्रीनंतर कंपनी पहिल्यांदाच पायाभूत सुविधा क्षेत्रात उतरणार आहे.

कंपनीने स्वतःच्या वापरासाठी सोलार उत्पादनांची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. सरकारच्या नवीन सोलार उत्पादन धोरणानुसार भांडवलासाठी 30 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. सध्या भारतीय सोलार बाजारपेठेत चिनी उत्पादनांचे वर्चस्व असून त्यांची गुणवत्ताही दर्जेदार नाही. 2006 मध्ये स्थापन झालेल्या पतंजली आयुर्वेदचा वेगाने विस्तार होत असून कंपनीचे महसूल पाच पटीने वाढत 10,561 कोटी कोटीवर पोहोचला आहे.

 31 मार्च 2018 पर्यंत तो 20 हजार ते 25 हजार कोटीपर्यंत नेण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

Related posts: