|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » उद्योग » भारताची चीनपेक्षा जास्त विकास दराची क्षमता

भारताची चीनपेक्षा जास्त विकास दराची क्षमता 

नवी दिल्ली :

भारत आणि चीन या आशियातील दोन देशांतील व्यापारी संबंध कायम राहिले आणि भारताने चीनप्रमाणे आर्थिक लक्ष्य ठेवल्यास भारताचा चीनपेक्षा जास्त वेगाने विकास होईल असे नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर अमेरिका, युरोप आणि जपानमधील अर्थव्यवस्था रुळावर येत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी ही योग्य बाब आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत होणाऱया सुधारणांचा भारत आणि चीनने लाभ उठविला पाहिजे असे नीति आयोग आणि चीनच्या डेव्हलपमेन्ट रिसर्च सेन्टरकडून आयोजित परिषदेत त्यांनी मत व्यक्त केले.

भारत आणि चीन हे दोन्ही देश एकत्र काम करत दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना हातभार लावू शकतात. पुढील तीस वर्षात भारत आर्थिक विकास दराबाबतीत चीनला मागे टाकू शकतो. चीनमधील विकास दर वाढीमुळे तेथील दारिद्रय़ निर्मूलनास मदत झाली, तशीच 2022 पर्यंत भारतात दोन आकडी विकास दर गाठत विकास करण्याचा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले.