|Sunday, February 23, 2020
You are here: Home » उद्योग » डिजिटल देयकासाठी किराणा दुकानदार इच्छुक

डिजिटल देयकासाठी किराणा दुकानदार इच्छुक 

इंटरनेटमुळे डिजिटल व्यवहार करणे शक्य  पीओएसच्या तुलनेत स्मार्टफोनला पसंदी : नोटाबंदीनंतर पीओ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. मात्र प्रत्येक गावात असणाऱया किराणा दुकानदारांना डिजिटल व्यवहार करणे योग्य वाटते, असे सेन्टर फॉर डिजिटल फायनान्शियल इन्क्लूजनच्या अहवालात म्हणण्यात आले.

या संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये डिजिटल व्यवहारांबाबत निमशहरी भागातील व्यापाऱयांची मते जाणून घेण्यात आली होती. या सर्व्हेक्षणादरम्यान 63 टक्के किराणा दुकानदारांनी रोखमुक्त व्यवहार करण्यास पसंद केले. डिजिटल व्यवहारांसाठी पॉईन्ट ऑफ सेल्स (पीओएस)ची खरेदी करण्यास आपल्याला आवडेल असे 45 टक्क्यांनी म्हटले. मात्र डिजिटल व्यवहार करण्यासाठी काही प्रमाणात सवलत मागण्यात आली आहे. आपले व्यवसाय मॉडेल कार्यरत राहण्यासाठी देयक शुल्क देण्यास ते तयार आहेत, असे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णन धर्मराजन यांनी म्हटले.

नोटाबंदीपूर्वी केवळ 5 टक्के किराणा दुकानदार पीओएस मशिनचा वापर करत होते. नोटांबदीच्या पहिल्या काही दिवसांत डिजिटल व्यवहार करणाऱयांची संख्या वाढली होती, मात्र ती आता पुन्हा घसरत आहे. मात्र मोबाईलच्या माध्यमातून व्यवहारांत वाढ होत आहे. पुरवठादारांना देयक देण्यासाठी किराणा दुकानदार डिजिटल व्यवहारांचा वापर करत आहेत. ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार करण्यासाठी लोकांमध्ये अजूनही उत्सुकता आहे. ग्रामीण भागातील 42 ते 45 टक्के किरकोळ व्यावसायिक मोबाईल वॉलेटचा वापर करण्यास इच्छुक आहेत.

देशातील 94 टक्के किराणा दुकानदारांकडे मोबाईल फोन असून 41 टक्के दुकानदारांकडे स्मार्टफोन आहेत. यापैकी 80 टक्के इंटरनेटचा वापर करतात. ग्रामीण भागात 86 टक्के लोकांकडे फोन असून स्मार्टफोनची संख्या 36 टक्के आहे. यापैकी केवळ 16 टक्के स्मार्टफोनधारक मोबाईल देयकासाठी वापर करतात.

अल्प किमतीत 4जी सेवा देण्यात येत असल्याने इंटरनेटचा विस्तार होत आहे. पीओएस मशिनपेक्षा स्मार्टफोन सध्या स्वस्त असल्याने डिजिटल देयकात वाढ होण्याच्या अनेक संधी आहेत असे अहवालात म्हणण्यात आले आहे.

एसमध्ये वाढ

Related posts: