|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » कॉफी निर्यातीत 8 टक्के वृद्धी

कॉफी निर्यातीत 8 टक्के वृद्धी 

नवी दिल्ली

भारताच्या कॉफी निर्यातीत 8.08 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. जानेवारी ते नोव्हेंबर 2017 दरम्यान 3.61 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत 3.34 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली होती. इन्स्टंट कॉफीव्यतिरिक्त रोबुस्टा आणि अराबिया या प्रकारातील कॉफीची निर्यात करण्यात येते. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान रोबुस्टा कॉफीची निर्यात 10.80 टक्क्यांनी वाढत 2,11,442 टनावर पोहोचली. गेल्या वर्षी समान कालावधीत 1,90,828 टन निर्यात होती. अराबिका प्रकारातील निर्यात 10.81 टक्क्यांनी घटली.

Related posts: