|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » उद्योग » तीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक

तीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या पेटीएम बँकेच्या विस्तारीकरणाची योजना करण्यात येत आहे. या योजनेनुसार पुढील तीन वर्षात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे ऑफलाईन वितरण नेटवर्क विस्तारण्यास मदत होईल. यासाठी कंपनी स्थानिक पातळीवर भागीदारी करणार आहे. कंपनीकडून देशभरात 1 लाख ‘पेटीएम की एटीएम’ सुरू करण्यात येतील. सध्या कंपनीकडे 3 हजार दालने सुरू करण्याची क्षमता आहे. कंपनीने गेल्या महिन्यात पेमेन्ट बँकेला सुरुवात केली असून ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. खात्यात किमान शिलक ठेवण्याचे बंधन असणार नाही. पहिल्या चरणात दिल्ली एनसीआर, लखनऊ, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, अलीगढसहित निवडक शहरांत पेटीएमकडून एटीएम लावण्यात येतील.

या ठिकाणी व्यावसायिक प्रतिनिधी काम करतील आणि बचत खाते उघडणे, पैसे जमा करणे अथवा खात्यातून काढणे यासारख्या सुविधा पुरवतील.

Related posts: