|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » ‘फिच’कडून भारताच्या विकास दरात अंदाजात कपात

‘फिच’कडून भारताच्या विकास दरात अंदाजात कपात 

नवी दिल्ली

फिच या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज घटविला. चालू आर्थिक वर्षात हा अंदाज 6.9 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला. पुढील दोन तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या संधी कमी दिसून येत आहेत असे संस्थेने म्हटले.

पुढील आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर 7.4 टक्क्यांवरून 7.3 टक्के करण्यात आल्याचे ग्लोबल इकोनॉमिक आऊटलूकमध्ये म्हणण्यात आले. मात्र सरकारकडून उचलण्यात येणाऱया आर्थिक सुधारणामुळे पुढील दोन वर्षांत विकास दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीदरम्यान भारताचा विकास दर 6.3 टक्के होता. त्या तिमाहीत हा तीन वर्षांच्या नीचांकावर म्हणजेच 5.7 टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र यानंतरही विकास दरात सुधारणा अपेक्षेपेक्षा कमी आहे. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे भारताला फटका बसला. आर्थिक सुधारणांसाठी सरकारला अजून निर्णय घ्यावे लागतील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवावा लागेल.

Related posts: