|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » उद्योग » आरबीआयच्या पतधोरणापूर्वी बाजारात दबाव

आरबीआयच्या पतधोरणापूर्वी बाजारात दबाव 

बीएसईचा सेन्सेक्स 67, एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारी बाजारात खालच्या पातळीवर चांगली रिकव्हरी दिसून आली. मात्र अखेरीस बाजार घसरत बंद झाला. शेवटच्या तासात बाजारात कमजोरी आली होती. निफ्टी 10,069 आणि सेन्सेक्स 32,682 पर्यंत घसरला होता. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला प्रारंभ झाला असून बुधवारी धोरण जाहीर करण्यात येईल. मात्र त्यापूर्वी बाजारात दबाव आला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 67 अंशाने घसरत 32,802 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 9 अंशाच्या घसरणीने 10,118 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात खालच्या पातळीवरून तेजी आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारत 26,812 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक वधारत 19,756 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक वधारत 17,920 वर स्थिरावला.

तेल आणि वायू, बँक समभागात खरेदी झाल्याने बाजार सावरण्यास मदत झाली. बँक निफ्टी 0.2 टक्क्यांनी वधारत 25,125 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारला. वाहन, आयटी, धातू, रिअल्टी, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा समभागामुळे बाजारात दबाव आला होता.

दिग्गज समभागांची कामगिरी

बजाज फायनान्स, यस बँक, एसबीआय, रिलायन्स इन्डस्ट्रीज, भारती एअरटेल, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक 1.9-0.4 टक्क्यांनी वधारले. हीरो मोटो, विप्रो, टाटा स्टील, ओएनजीसी, यूपीएल, टाटा स्टील, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज लॅब 2.3-1.6 टक्क्यांनी घसरला.

मिडकॅप समभागात श्रीराम ट्रान्स्पोर्ट, अल्केम लॅब, एल ऍण्ड टी फायनान्स, भारत फोर्ज, पेट्रोनेट एलएनजी 6-2.9 टक्क्यांनी वधारले. जेएसडब्ल्यू एनर्जी, नाल्को, जिंदाल स्टील, अशोक लेलँड 3.5-2 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात हॅथवे केबल, द्वारिकेश शुगर, डेन नेटवर्क्स, रॅडिको खेतान, नूट्राप्लस इंडिया सर्वाधिक 16-10 टक्क्यांनी वधारले. एमटी एज्युकेयर, थीमिस मेडिकेयर, सिकाल लॉजिस्टिक्स, मिंडा इन्डस्ट्रीज सर्वाधिक 10.8-6 टक्क्यांनी घसरत बंद झाले. 

Related posts: