|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली

मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली 

प्रतिनिधी / बेळगाव

विश्व मानव हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱया रॅलीमध्ये सर्व अधिकाऱयांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी या बैठकीत केली. मानव हक्कबाबत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. याच बरोबर त्या दिवशी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे विविध मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.

या दिनानिमित्त किल्ला तलाव येथून रॅली काढण्यात येणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत ही रॅली निघणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कायद्याचे ज्ञान असलेले व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. या रॅलीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱयांबरोबर पोलीस, विद्यार्थी तसेच समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून विविध संघटनांना सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.