|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » आरबीआयचे पतधोरण जाहीर,रेपो रेट जैसे थे

आरबीआयचे पतधोरण जाहीर,रेपो रेट जैसे थे 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवले आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे.त्यानुसार रेपो दर 6 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के असे कायम ठेवण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या मते,अर्थिक वर्ष 2018मध्ये देशाचा जडीपी 6.7 टक्क्यांनी वाढू शकतो. बँकेने दुसऱया सहामाहीत महागाई दर हा 4.3 ते 4.6टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नवीन पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी बँक 200हून अधिक पाँईंटने कमी झाले असून सेन्सेक्समध्येही 196 अंकाची घसरण झाली. केंद्रीय बँकेच्या एमीसीने द्वैमासिक समीक्षेत रेपो रेट 6 टक्केच कायम ठेवला. तर रिझर्व्ह रेपो रेट 5.75टक्के, सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 19.5 टक्के कायम ठेवला आहे. या समितीतील प्रो.रवींद्र ढोलकिया यांनी यावेळी 0.25टक्के कपातीचे समर्थन पेले. पण इतर5 सदस्यांनी याला नकार दर्शवला.

 

Related posts: