|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थांबणार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थांबणार 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 9 डिसेंबरला होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज ठंडावणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह काही नेत्यांच्या आज गुजरातमध्ये रॅली निघणार आहेत.

पंतप्रधान मोदी सुरतमध्ये रॅलीला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने मोदींना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी राज्यभरात काँग्रेसकडून पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मागील आठ दिवसांपासून टृवटरवरून उपस्थित केलेले प्रश्न या पत्रकार परिषदांमधून मोदी आणि भाजप नेत्यांना विचारण्यात येणार आहेत.

गुजरातमधील विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबर रोजी होणार आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी 89 जागांसाठी हे मतदान होईल. मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह 977 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Related posts: