|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » युपी पालिका निवडणूक; भाजपच्या 45 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

युपी पालिका निवडणूक; भाजपच्या 45 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त 

ऑनलाईन टीम / उत्तरप्रदेश :

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपच्या पराभूत उमेदवारांपैकी 45 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम जप्त करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या तीन हजार सहाशे छप्पन एवढी आहे. तर दोन हजार तीनशे सहासष्ट उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहे.

विजयी उमेदवारांपेक्षा पराभूत उमेदवारांची संख्या जास्त आहे. पक्षाच्या सर्व जागा धरून विजयाची टक्केवारी ही 30.8 टक्के इतकी आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपला फक्त 11.1 टक्के मतं मिळाली आहेत. राज्यात 12,644 पैकी भाजपने 8,038 उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. यामध्ये सुमारे अर्ध्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे 664 उमेदवार विजयी झाले आहेत. पण पराभूत उमेदवारांची संख्या ही 1462 इतकी आहे.