|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » रोनाल्डोच्या गोलांचा आणखी एक विक्रम

रोनाल्डोच्या गोलांचा आणखी एक विक्रम 

वृत्तसंस्था /बार्सिलोना :

पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने गोल नोंदविण्याचा आणखी एक नवा विक्रम केला आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रीद संघाकडून बुधवारच्या बोरूसिया डॉर्टमंड संघाविरूद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हा विक्रम नोंदविला. विविध स्पर्धामध्ये सहा गटातील सामन्यात गोल नोंदविणारा रोनाल्डो हा पहिला फुटबॉलपटू आहे.

या स्पर्धेतील च गटातील शेवटच्या सामन्यात रोनाल्डोने 12 मिनिटाला हा गोल नोंदवून रियल माद्रीदची आघाडी दुप्पट केली. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या सहाव्या हंगामात रोनाल्डोने आतापर्यंत नऊ गोल करून नवा इतिहास नोंदविला आहे. ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील हंगामात 32 वर्षीय रोनाल्डोची कामगिरी फारशी प्रभावी झाली नाही. त्याने या स्पर्धेत केवळ दोन गोल नोंदविले आहेत.  2017 च्या फुटबॉल हंगामात बलुन डी ओर पुरस्कारासाठी रोनाल्डोची निवड अपेक्षित आहे. अर्जेंटिनाच्या मेस्सीने आतापर्यंत हा पुरस्कार पाचवेळा पटकाविला आहे.

Related posts: