|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » ‘लव्ह जिहाद’च्या नावाने तरुणाची हत्या करणारा अटकेत

‘लव्ह जिहाद’च्या नावाने तरुणाची हत्या करणारा अटकेत 

ऑनलाईन टीम / राजसमंद :

‘लव्ह जिहाद’च्या नावाने तरुणाची हत्या करून मृतदेह जाळणाऱया तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवणाऱया आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या राजसमंद शहरात हा प्रकार घडला होता.

शंभुलाल रेगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत 13 वषीय मुलगी आणि 15 वषीय भाच्यालाही ताब्यात घेण्यात आले. हत्येचा व्हिडिओ भाच्याने बनवला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जिह्यात इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे. आरोपी शंभुलाल याने बुधवारी ‘लव्ह जिहाद’, दहशतवाद या मुद्यांवर भाषण देत संबंधित घटनेचा व्हिडिओ बनवला होता. त्याने हत्येच्या एक दिवसापूर्वी 5 नोव्हेंबरला, तर दोन व्हिडिओ घटनेच्या दिवशी बनवले होते.

आरोपीने बनवलेल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हत्येचे कारण स्पष्ट आहे. लोकांनी त्याच्या भागातील एका मुलीला पळवून नेले होते. तिला सोडवण्यासाठी आरोपी पश्चिम बंगालमध्ये गेला होता. तेव्हापासून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.