|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » छोटा उदयपूरमध्ये काँग्रेससमोर आव्हान

छोटा उदयपूरमध्ये काँग्रेससमोर आव्हान 

उदयपूर

छोटा उदयपूर, जोधपूर आणि संखेडा या मतदारसंघांमध्ये दुसऱया टप्प्यात अर्थात 14 डिसेंबरला मतदान होत आहे. या तीन जागांपैकी छोटा उदयपूर आणि संखेडा येथे 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. तर भारतीय जनता पक्षाने जेतपूरची जागा जिंकली होती. मात्र, यंदा छोटा उदयपूर आणि संखेडा येथे काँग्रेस उमेदवारांसमोर तगडय़ा भाजप उमेदवारांचे आव्हान असल्याचे दिसत आहे.

संखेडा येथे विद्यमान काँग्रेस आमदार धीरूभाई भिल्ल यांना भाजपचे अभयसिंह तडवी यांच्याशी चुरशीची लढत द्यावी लागत आहे. तडवी यांनी ही जागा खेचण्यासाठी जोर लावला असून गेल्यावेळी काँग्रेस उमेदवाराचा येथे निसटता विजय झाल्याने भिल्ल यांनाही आकाशपाताळ एक करावे लागत आहे. त्याचप्रमाणे छोटा उदयपूरमध्येही भाजपने तरुण आदिवासी उमेदवार दिलेला असल्यामुळे काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात पक्षाला विजयासाठी अधिक झटावे लागणार, असे तज्ञांचे मत आहे. तर जेतपूरची जागा राखण्यासाठी भाजपलाही बराच घाम गाळावा लागणार, असे दिसत आहे. एकंदर छोटा उदयपूर जिल्हय़ात काही जागांवर अनपेक्षित निकाल लागण्याची शक्मयता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Related posts: