|Monday, September 16, 2019
You are here: Home » leadingnews » गुजरातचा मतसंग्राम ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

गुजरातचा मतसंग्राम ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. 19 जिह्यातील 89 जागांसाठी हे मतदान होत आहे. यात 89जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत.

सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱया भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळणाऱया राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे राजकोट पश्चिमधून निवडणूक लढवत आहेत.आज सकाळी नऊच्या दरम्यान त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.