|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराला गुगलची आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराला गुगलची आदरांजली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार होमाई व्यारावाला यांना गुगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना होमाई व्यारावाला यांनी आपल्या कॅमेऱया कैद केल्या होत्या.

होमाई व्यारावाला यांचा जन्म एका पारसी कुटुंबात गुजरात येथे झाला .त्यांना ‘डालडा 13’ या टोपणनावाने ओळखले जात होते.या नावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म 1913मध्ये झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पहिल्या गाडीचे नंबर डीएलडी 13 होता. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले.आपल्या मित्राकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1939मध्ये त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफीला सुरूवात केली.1942मध्ये त्यांनी दिल्लीत ब्रिटीश इन्फर्मेशन सर्व्हिसेस ऑफ फोटोग्राफरमध्ये काम करण्यास सुरूवात केली.

स्वातंत्र्या लढय़ाच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू,महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांची,तसेच,स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक महत्त्वच्या घटना त्यांनी आपल्या कॅमेऱयात कैद केल्या.2012मध्ये त्यांचे किरकोळ अपघातानंतर रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना 2011मध्येभारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कारानेही गौरवले होते.

 

 

 

Related posts: