|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » विविधा » राज्यात आणखी 16 नवीन पासपोर्ट केंद्र सुरू होणार

राज्यात आणखी 16 नवीन पासपोर्ट केंद्र सुरू होणार 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

मार्च 2018पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही माहिती दिली.

देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा आता सहज उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील 20 पासपोर्ट केंद्रांपैकी 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर,औरंगाबाद,कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहे. उरलेली 16पासपोर्ट केंद्र लवकरच सुरू होतील अशी माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात नवीन 16 पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग,वर्धा,जालना,लातूर,अहमदनगर,पंढरपूर,सांगली,बीड,मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य,घाटकोपर,नवीमुंबई, डोंबिवली,पनवेल,नांदेड व जळगाव याठिकाणी नवीन केंद्र सुरू होतील.या 16 नवीन पासपार्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.

 

Related posts: