|Monday, August 19, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

वृश्चिक राशीत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. या सप्ताहात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुसऱयांच्या कलाने वागावे लागेल. नोकरीत, कामात वाढ होईल. संसारात तुमची जबाबदारी वाढेल. घरात किरकोळ अडचणी व वाद होईल. धंद्यात लक्ष द्या. आळस त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे पार करता येतील. गर्वि÷पणा कुठेही करू नका. मार्ग शोधता येईल. कोर्टकेसच्या कामात उतावळेपणा नको.


वृषभ

या सप्ताहात तुम्ही महत्त्वाची कामे करून घ्या. वृश्चिकेत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. बुधवार, गुरुवार मनाविरुद्ध काम करण्याची वेळ येईल. धंद्यात मोठी गुंतवणूक करण्याची घाई नको. कोर्टाच्या कामात सतर्क रहा. थोडीफार मदत मिळण्याची शक्मयता आहे. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. परदेशात जाण्याचा योग येऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. रोजचे काम वेळच्यावेळी करा. प्रति÷ा राहिल.


मिथुन

संसारात किरकोळ वाद व नाराजी असली तरीही परिस्थिती सावरून घेऊ शकाल. धंद्यात मात्र अडचणी येतील. वृश्चिकेत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात एखादा प्रश्न मनस्ताप देणारा  घडू शकतो. महत्त्वाचा कोणताही निर्णय पुढे ढकला. आर्थिक गुंतवणूक करण्याचा उतावळेपणा नको. नवीन ओळख झालेल्या माणसावर जास्त भरवसा ठेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या.


कर्क

कोणतेही कठीण व किचकट वाटणारे काम याच सप्ताहात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वृश्चिकेत बुध वक्री धंद्यात फायदा करून देईल. धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. नोकरीत वरि÷ांचे मत ऐकावे लागेल. संसारात शुभ समाचार मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. राजकीय सामाजिक कार्यात हाती घेतलेले काम जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धंद्यातील थकबाकी वसूल करा.


सिंह

वृश्चिकेत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश होत आहे. आत्मबळ टिकले तरी अडचणी येतील. कौटुंबिक वाटाघाटीत वाद संभवतो. संसारात मतभेद होतील. जीवनसाथीची मर्जी राखावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. राजकीय- सामाजिक कार्यात नमते घ्यावे लागेल. कार्याची दिशा निश्चित ठरवता येणार नाही. गुप्तकारवायांचा सामना करावा लागेल. कोर्टकेसमध्ये कमीच बोला. अपमान सहन करावा लागेल. पुढे संधी आहे.


कन्या

या सप्ताहात कोणताही महत्त्वाचा निर्णय झाल्यास ठीक राहील. वृश्चिकेत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. तुमचे मुद्दे व विचार इतरांना पटवून देता येतील. सामाजिक कार्याचा विस्तार करू शकाल. लोकप्रियता मिळेल. राजकारणात तुमच्या हिताचा विचार आताच होऊ शकतो. धंद्यात मोठे काम मिळेल. दुर्लक्ष नको. प्रेमाला चालना मिळेल. संसारात आनंदी वातावरण  राहील. कोर्टाच्या कामात यश मिळेल.


तुळ

सोमवार, मंगळवार कामाचा व्याप वाढेल. प्रवासात सावध रहा. किरकोळ दुखापत संभवते. वृश्चिकेत  बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश तुमच्या कार्यात यश देणार आहे. राजकीय कार्यात उत्साहवर्धक घटना घडेल. प्रति÷ा मिळेल. सामाजिक क्षेत्रात आर्थिक सहाय्य मिळवता येईल. लोकांच्या सुखासाठी योजना राबवता येईल. आश्रम, शाळा, कॉलेज सारखे प्रकल्प उभारता येतील. मेहनत घ्या. धंदा वाढेल. शेतीला नवा फंडा उपयोगी पडेल. अविवाहितांना  स्थळे मिळतील. प्रत्येक दिवस यश देईल.


वृश्चिक

स्वराशीत बुध वक्री व धनुराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. बुधवार, गुरुवार तुमचा संताप वाढेल. संयम ठेवा. प्रवासात सावध रहा. धंद्यात फायदेशीर घटना घडेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. पैसा, कुणी कुणाला देत नाही. कोर्टकेसमध्ये मोठय़ा लोकांचे सहाय्य मिळू शकेल. तरीही स्वत: लक्ष द्या. आळसाने व्यसनात भर पडते. आयुष्य बिघडवू नका. लोभ कमीच ठेवा कष्ट घ्या.


धनु

साडेसाती सुरू आहे. वृश्चिकेत बुध वक्री व स्वराशीत सूर्य प्रवेश होत आहे. या सप्ताहात कोणत्याही कारणाने मनावर व शरीरावर एखाद्या प्रसंगाने परिणाम होऊ शकतो. जवळच्याच व्यक्तीने केलेल्या चुका सुधारण्यात वेळ जाईल. धंद्यात सावध रहा. फसगत संभवते. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीवर मात करावी लागेल. तुमचे मुद्दे इतरांना पटणे कठीण आहे. कोर्टाच्या कामात खर्च वाढू शकतो. संयम ठेवा.


मकर

रविचे राश्यांतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात शत्रुपदाकडून त्रास संभवतो. प्रति÷sला धक्का पोहचणार नाही याची काळजी घ्या. शेतीच्या कामात चांगली प्रगती संभवते. व्यवसायात फायदा संभवतो. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. घरातील समस्यांवर मार्ग सापडेल. मैत्रीत व्यवहार करू नका. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो. आर्थिक लाभ संभवतो. विद्यार्थीवर्गाला ग्रहांची चांगली साथ आहे. त्यामुळे ते विजयश्री खेचून आणू शकतील.


कुंभ

नोकरीत  कामात थोडे लक्ष लागणार नाही. रोजच्या कामाचा कंटाळा येईल. आठवडय़ाची सुरुवात थोडी वादाने व गैरसमजाने घेऊ शकते. मात्र नंतर ते मिळतील. धंद्यात नवीन योजना सांभाळल्यास जास्त फायदा होऊ शकतो. नियमितता ठेवणे गरजेचे आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. आपल्या विरोधातले लोक आपल्या बाजूने बोलण्यास सुरुवात होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान वाढेल.


मीन

शेतकरी वर्गाने कर्जाचे डोंगर कमी करण्याचा प्रयत्न करावा. पिकाला पाहिजे तो भाव मिळणे थोडे कठीण जाणार आहे. कला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवता येईल. नोकरीत तडकाफडकी निर्णय घेऊ नका. नोकरीत बदल किंवा बदली संभवते पण विचारपूर्वक व शांतपणे निर्णय घ्या. विद्यार्थीवर्गाला अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.