|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दलित अत्याचार विरोधी भारिप करणार सोमवारी आक्रोश

दलित अत्याचार विरोधी भारिप करणार सोमवारी आक्रोश 

प्रतिनिधी/ सातारा

देशामध्ये आणि राज्यांमध्ये तसेच सातारा जिह्यात दलित, अल्पसंख्याक गरीब समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. त्यामध्ये वाढ होत असल्याने जनतेमध्ये दडपणाचे वातावरण आहे. खैरलांजी,खर्डा ते चिंचणेर- वंदन या घटनांवरून दिसून येते. या वाढत्या अत्याचार विरोधात भारिप बहुजन महासंघाच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दि. 11 रोजी आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारीपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे यांनी दिली.

घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत खंडाईत म्हणाले, दलितांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. गतवर्षी सातारा जिह्यातील चिंचणेर- वंदन प्रकरण घडले होते. त्यामध्ये त्यावेळी ज्यांनी ज्यांनी भेटी दिल्या होत्या त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते. अजूनही कशाचीही पूर्तता केली गेली नाही. अजूनही तेथील दलित समाजाला भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. 2016-17 मध्ये सातारा जिह्यात 112 च्या अस्ट्रोसिटी, विनयभंग आणि बलात्कार 44 , तर चार खून घटना घडल्या आहेत. देशामध्ये अशा घटना घडू लागल्या आहेत. अन्याय अत्याचार करण्याया लोकांवर जरब बसवण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येत आहे.त्यामुळे अन्याग्रस्तांना न्याय मिळताना दिसून येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून ज्या संविधानाने सर्वाना समान न्यायाची संकल्पना असताना याला हडताळ फासल्याचे निदर्शनास येत आहे. या बाबीचा विचार करून दलित पीडित अत्याचार ग्रस्ताना न्याय आणि सुरक्षिततेची हमी मिळावी यासाठी भारिप बहुजन महासंघ आणि समविचारी संघटना यांच्यावतीने या प्रश्नांना न्याय मिळावा याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एकदिवस आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे . या आंदोलनात अन्यायग्रस्त यांच्याबरोबर सर्व कार्यकत्यांनी, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील आणि प्रशासनाला जग आणण्याचे काम क्रांतिकारी सातारा जिह्यातील या आंदोलनाने करण्यात येणार आहे, असे खंडाईत यांनी सांगितले.

 

Related posts: