|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लाखमोलाचे तळे मातीमोल

लाखमोलाचे तळे मातीमोल 

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात नैसर्गिक तळी असताना देखील पर्यावरणाला धोका या गोंडस नावाखाली गणेशमुर्ती विर्सजनासाठी लाखो रुपये खर्चून कृत्रीम तळे गेल्या तीन वर्षापासून तयार करण्यात येते. व नंतर हेच लाखमोलाचे तळे दरवर्षी मातीमोल केले जाते. आत्तापर्यंत नगरसेवक रस्ता, बांधकाम, बागा विविध ठेकेदारीत पैसा खाताना दिसत. परंतु कृत्रीम तळ्याच्या नावाखाली लाखो रुपये खाण्याचा नवीन फंडा या मंडळींना मिळाला असुन तो सलग तीन वर्षे प्रामाणिकपणे राबवला जात आहे. यंदाचे तळे रविवारी पुर्णपणे माती टाकुन मुजवण्यात आले.

साताऱयातील नैसर्गिक तळ्यात गणेशमुर्तीचे विर्सजन करुन पुन्हा ही तळी स्वच्छ केली असती तरी कितीतरी पटीने सातारा नगरपालिकेचे अर्थात साताऱयातील नागरिकांचे पैसे वाचले असते व दरवर्षी तळी ही स्वच्छ झाली असती परंतु यामध्ये नगरसेवकांना मलिदा मात्र म्हणावा असा मिळाला नसता किरकोळ मिळालेल्या मलिद्यात पुन्हा अनेक वाटेकरी त्यामुळे मलिदाच भक्कम मिळवायचा असल्यास कृत्रीम तळ्याशिवाय पर्याय नसल्याचे सत्ताधारी नगरसेवकांनी जाहीर केले व सलग तीन वर्ष राधिकारोड वरील जिल्हापरिषदेच्या शेतीफार्मच्या जागेत लाखो रुपये खर्चून ही तळी तयार केली जातात.

व पुन्हा दहा दिवसांनंतर बऱयाच दिवस त्याकडे पाहिले जात नाही. जनतेतुन ओरड सुरु झाल्यावर मग हे लाखमोलाच तळ पुन्हा मातीमोल केले जाते.

तीन वर्षात 1 कोटी 4 लाख खर्च

कोणतेही काम नगरपालिकेत घेवून गेल्यास निधी नाही असे उत्तर दिले जाते परंतु या कृत्रीम तळ्यासाठी पहिल्या वर्षी 52 लाख, दुसऱया वर्षी 32 लाख व तिसऱया वर्षी 20 लाख असा एकुण तीन वर्षात 1 कोटी 4 लाख रुपये खर्चकरण्यात आला एवढय़ा पैशात सातारकरांसाठी एखादी चांगली योजना कार्यान्वित करण्यात आली असती.

तसेच वाढत्या महागाईने दरवर्षी खर्च वाढता हवा परंतु मागील तीन वर्षात याकामी खर्च झालेले आकडे पहिल्यास पैसे वाढण्याऐवजी कमी झालेत तेही तब्बल 20 लाखांनी म्हणजे एकाच पध्दतीच्या कामाला एकदा 52, परत 32, व नंतर 20 लाख रुपये लागतात म्हणजे भरपुर पैसे खाल्ल्याचे सिध्द होत आहे.

Related posts: