|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मगोमुळे आहे भाजपचे सरकार!

मगोमुळे आहे भाजपचे सरकार! 

 

प्रतिनिधी/ पणजी

मगो पक्ष आहे म्हणून भाजपचे सरकार आहे, असे सांगून संयुक्त सरकारमध्ये तडजोड ही करावीच लागते, असे निवेदन वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. गोव्यातील नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मान्यता देण्यास त्यांनी सहमती दर्शवली आणि त्या मार्गे केंद्राची मिळणारी कोटय़ावधीची रक्कम नद्यांच्या विकासासाठी वापरता येईल असेही ते म्हणाले. गोव्याकरीता सागरमाला प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मगो पक्ष पणजी कार्यालयात काल सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. ढवळीकर बेलत होते.

नद्यांचा विकास होणे आवश्यक

ते पुढे म्हणाले की नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या विरोधात ग्रामसभेत होणारे ठराव हे गैरसमजुतीने किंवा दडपणाखाली घेतले जात असून तो विरोध चुकीचा आहे. कोकण रेल्वे, मोपा विमानतळ या राष्ट्रीय प्रकल्पांना जसा विरोध झाला तसाच प्रकार राष्ट्रीय जलमार्ग प्रकरणात होत आहे. गोव्यातील नद्यांचा विकास आवश्यक असून गाळ काढल्याशिवाय आणि त्यांची सफाई केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्यासाठी लागणारा निधी सुमारे 2000 ते 3000 कोटी केंद्रांकडून मिळू शकतो आणि त्याचा वापर करून नद्यांचा विकास साधता येईल. म्हणूनच सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी राबवणारच, असे सांगून त्याकरता मिळणारा रु. 7000 कोटीचा निधी वापरता येणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.

मगोबाबतच्या बातम्या चुकीच्या : दिपक ढवळीकर

मगो पक्षाची आमसभा 17 डिसेंबर रोजी मराठा भवन पर्वरी येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यात केंद्रीय समितीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी केंद्रीय समितीचा कार्यकाल संपत असून तत्पूर्वी तिला मुदतवाढ मिळावी म्हणून आमसभेत तो विषय आणण्यात येईल. मगो पक्ष संघटीत असून तो कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, असे सांगून त्यासंदर्भात प्रकाशित होणाऱया बातम्या चुकीच्या असल्याचा माहिती अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.

प्रसंगी मगो लोकसभा निवडणूकही लढवेल : ढवळीकर

मगो पक्ष एनडीएचा घटक पक्ष नाही. तसा प्रस्ताव आपल्याकडे आला होता, परंतु त्यावर पक्षाने निर्णय घेतलेला नाही, असे सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. गरज पडली तर मगो लोकसभा निवडणूकही लढवेल. जे कोणी पक्षाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवतात त्यांना शोधून काढण्यात येईल. काँग्रेस व भाजपाने मगो विलीन करण्याचा आणि मला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आपण नाकारला असे ढवळीकर यांनी नमूद केले.

Related posts: