|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » कच्च्या तेलाच्या किमती अडीच वर्षांच्या उच्चांकावर

कच्च्या तेलाच्या किमती अडीच वर्षांच्या उच्चांकावर 

वृत्तसंस्था\नवी दिल्ली

कच्च्या तेलाच्या किमतीत वेगाने वाढ झाल्याने आयात करणाऱया भारतासारख्या देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवार बेंट खनिज तेलाच्या किमती 2.5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दिवसभरात या किमती 65.70 डॉलर प्रतिपिंपावर पोहोचल्या होत्या. 24 जून 2015 च्या पातळीवर या किमती पोहोचल्या आहेत. खनिज तेलाच्या किमती गेल्या 6 महिन्यात 47 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जूनमध्ये या किमती 44.48 डॉलरवर होत्या.

ब्रेंट खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने देशातील तेल वितरण कंपन्यांवरील दबावात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील खर्चात वाढ होण्याच्या शक्यतेने या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. मंगळवारी तेल वितरण करणाऱया कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. हिंदुस्थान पेट्रोलियम 4.20 टक्के, बीपीसीएल 3.02 टक्के, आयओसी 2.03 टक्के, रिलायन्स इन्फ्रा 1.94 टक्के आणि रिलायन्स इन्डस्ट्रीज 0.04 टक्के आणि एनटीपीसी 1.40 टक्क्यांनी घसरले. तेल वितरण कंपन्या इंधनाच्या दरात वाढ करतील अशी शक्यता आहे.

ब्रिटनच्या उत्तर समुद्रातील प्रमुख पाईपलाईन दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे तेलाच्या किमती वाढल्याचे सांगण्यात येते. ब्रिटनमध्ये तेल आणि वायू पाईपलाईन बंद करण्यात आल्याने किमतीत वाढ झाल्याचे समजते.