|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » रोहित सुपर‘हिट’ ;  नाबाद 208 धावा

रोहित सुपर‘हिट’ ;  नाबाद 208 धावा 

ऑनलाईन टीम  / मोहाली :

मोहाली येथे सुरु असलेल्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडत नाबाद 208 धावा फटकाविल्या. 12 षट्कार आणि 13 चौकारांसह रोहितने प्रेक्षकांच्या डोळय़ाचे पारणे फेडले. 153 बॉलमध्ये रोहितने आपले हे द्विशतक पूर्ण केले. भारताने श्रीलंकेसमोर 392 धावांचे आव्हान ठेवले आहे.

सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर 68 धावांवर शिखर धवन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा व श्रेयस अय्यरने सामन्याची धुरा सांभाळली. शतक झाल्यानंतर तुफान फटकेबाजीला रोहितने सुरुवात केली. याला श्रेयस साथ देत असतानाच परेराने त्याला 88 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनीही फारशी कमाल केली नाही. त्याने सात धावा केल्या. मात्र, दुसरीकडे रोहितची फटकेबाजी सुरुच होती. त्याने 153 बॉलमध्ये नाबाद 208 धावा केल्या.

Related posts: