|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिकेतर्फे तीन दुकानावर कारवाई

फोंडा पालिकेतर्फे तीन दुकानावर कारवाई 

प्रतिनिधी/ फोंडा

बुधवारपेठ फोंडा येथील व्यवसायिक परवान्याशिवाय थाटलेल्या दुकानदारांवर    फोंडा पालीकेतर्फे कारवाई करण्यात आली. यावेळी पालीकेचे मुख्याधिकारी नवनाथ नाईक यांनी सदर दुकानदारांना  वैध व्यवसायिक परवाना काढावा अशी सक्त ताकिद दिली. तसेच दुकाने सुरू केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशाराही दिला. 

यावेळी बुधवारपेठ मार्केट परीसरातील तीन दुकानावर ही कारवाई करण्यात आली. 2 तयार कपडय़ाची व 1 मोबाईल संच विक्री दुकानांचा यात समावेश आहे. पालिकेतर्फे मार्केट परीसर ते बागायतदार बाझारपर्यत वाहतूक कोंडीची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे हटवून दुचाकीचालकांना पार्किग व्यवस्थेसाठी ‘ट्रक मार्ग’ आरक्षित करण्यात आला. सुमारे 30 मिटर रस्त्यावर मार्किंग करण्यात आले असून या कामाला कालपासून प्रारंभ करण्यात आला.

दुचाकी पार्किगसाठी शिस्तबद्धता व चालकांसाठी जागृती आवश्यक

पालीकेतर्फे वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना दुचाकीसाठी पार्किग व्यवस्था  स्वागतार्ह आहे तरीही पार्किगची चालकांमध्ये जागृती व शिस्तबद्धतरित्या ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस ठेवण्याची गरज आहे अशा प्रतिक्रिया ग्राहकांना व्यक्त केल्या. पार्क केलेली वाहने रस्त्यावर काढताना ग्राहकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पार्किगची व्यवस्था करतान पादचाऱयांना चालण्यासाठी फुटपाथ करणे आवश्यक होते. फुटपाथ व दुचाकी पार्किगची सरळ रेषेत असून रस्त्याच्या बाजूने उंचवटा असल्यामुळे दुचाकीचालकांना पार्किग केलली गाडी हटविण्यासाठी त्रास सहन करावा लागला. वाहन पार्क करताना गटारावरून मार्किग पेल्यामुळे इथे वाहने पार्क करताना गाडी रूतण्याच्या तक्रारीही चालकांनी ऐकविल्या

मार्केट कॉप्लेक्समधील तळमजल्यावर वाहतूक पार्किग ओस

मार्केट कॉप्लेक्समधील तळमजल्यावर असलेले पार्किग वाहनाअभावी ओस पडल्याचे दिसून येते. सुमारे 200 वाहनांची सुसज्ज पार्किग करण्याची व्यवस्था असतानाही पालिकेतर्फे याकामी उपाययोजना करण्यात येत नाही. बाजराहटीसाठी येणाऱया ग्राहकांनाही घाई असते तसेच येथील वाहतूक पोलीसांवर मल्लनिस्सारण प्रकल्पाच्या खड्डय़ाना सुरक्षा देण्यासाठी गुंतलेले असल्याने रस्त्यावर पार्क करणाऱया दुचाकीवर ते कानाडोळा करताना दिसतात. एकूणच बुधवार पेठ ते बागायतदार बाझारपर्यत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस व पालिका कर्मचारी यांचे संगनमत आवश्यक आहे. त्याप्रमाणे पालिका कर्मचारी व वाहतूक पोलिस यांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.