|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » दोन एसटींची धडक, चालक ठार तर 30जखमी

दोन एसटींची धडक, चालक ठार तर 30जखमी 

ऑनलाईन टीम / बीड  :

दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बस चालकाचा मृत्यू तर 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या अपघातात लातूर- परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय 40)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमीमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे.