|Monday, February 17, 2020
You are here: Home » उद्योग » भारतीय भांडवलबाजार वधारला

भारतीय भांडवलबाजार वधारला 

मुंबई/ वृत्तसंस्था :

गुजरात निवडणुकीवरून भांडवलबाजारात गुरुवारी देखील सतर्क दृष्टीकोन दिसून आला. दिवसभरात मोठा उतार-चढाव अनुभवयास मिळाला आणि अखेरच्या तासात बाजाराने चांगली कामगिरी नोंदविली. राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 10250 अंकांवर बंद होण्यास यशस्वी ठरला, तर मुंबई शेअरबाजार निर्देशांक 194 अंकांनी वधारला. गुरुवारी जाहीर होणाऱया एक्झिट पोलच्या निष्कर्षांचा शुक्रवारच्या उल्नाढालीवर परिणाम होऊ शकतो.

मुंबई शेअरबाजार निर्देशांक 194 अंक म्हणजेच 0.6 टक्क्यांच्या वधारासह 33247 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 59 अंक म्हणजेच 0.6 टक्क्यांच्या तेजीसह 10252 अंकांवर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्दैशांकात संमिश्र कामगिरी राहिली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी खाली आला.

बँकिंग, एफएमसीजी, फार्मा आणि ऑईल अँड गॅस समभागांमध्ये चांगली खरेदी आढळून आली. बँक निफ्टी 0.7 टक्क्यांच्या तेजीसह 25168 अंकांवर बंद झाला. परंतु गुरुवारी मीडिया, कंझ्यूमर डय़ूरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि पॉवर समभागांवर दडपण दिसून आले.

गुरुवारी दिग्गज समभागांमध्ये एचपीसीएल, डॉ. रेड्डीज, सिप्ला, टेक महिंद्रा, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऍक्सिस बँक हे 1.25-3.3 टक्क्यांनी वधारले. परंतु दिग्गजांमध्ये टीसीएस, गेल, यूपीएल, अरविंदो फार्मा आणि सन फार्मा 0.5-2.7 टक्क्यांनी खाली आले.

मिडकॅप समभागांमध्ये वॉकहार्ट, ओबेरॉय रियल्टी, टोरेंट पॉवर, डिविज लॅब्स आणि नाल्को हे 1.7-5.5 टक्क्यांनी मजबूत झाले. परंतु मिडकॅप समभागांमध्ये ब्लू डार्ट, कंसाय नेरोलॅक, बजाज होल्डिंग्स, एनएलसी इंडिया आणि जिलेट इंडिया 2-3.1 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागांमध्ये वाटरबेस, अटलांटा, न्यूट्राप्लस इंडिया, ओके प्ले आणि मनपसंद बेव्हरेजेज हे 7.8-19.7 टक्क्यांनी वधारले. परंतु स्मॉलकॅप समभागांमध्ये बादेल केमिकल्स, मर्केटर, व्हीबी इंडस्ट्रीज, केडीडीएल आणि बटरफ्लाय 5-7.5 टक्क्यांनी खाली आले.

Related posts: