|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » कागलमधील अपघात प्रकरणी अजिंक्य रहाणेच्या वडीलांना अटक

कागलमधील अपघात प्रकरणी अजिंक्य रहाणेच्या वडीलांना अटक 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर  :

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने गुरूवारी दुपारी पुणे-बंगळुरू महामार्गावर एका महिलेला धडक दिली.या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूरातील कागल येथे ही घटना घडली असून या प्रकरणी कागल पोलिसांनी वधुकर बाबूराव रहाणे यांना अटक केली आहे.आशाताई कांबळे असे मृत महिलेचे नाव असून त्या 67वर्षांच्या होत्या.

एमएच03सीबी 2021 हुंडाय आय20 कारने आशाताई कांबळे यांना धडक दिली.कागल येथे रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला.गंभीर जखमी झालेल्या आशाताई कांबळे यांना एका युवकाने तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले.तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघताच्यावेळी नेमके कोण गाडी चालवत होते ते स्पष्ट झालेले नाही.पण अजिंक्यचे वडिल मधुकर बाबूराव रहाणे यांच्या मालकीची ही गाडी असल्याची माहिती आहे.