|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » नासाने लावला नव्या सूर्यमालेचा शोध

नासाने लावला नव्या सूर्यमालेचा शोध 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे. एनएआयए या वृतसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सध्या नासा गूगलसोबत ‘एलियनन वर्ल्ड’चा शोध घेत आहे, केप्लर स्पेस टेलिकोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आल्याची माहिती आहे. या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत.नासाकडून या संदर्भातली कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

आपल्या सूर्यामालेत ज्याप्रमाणे सूर्याभोवती ग्रह फिरत आहेत आगदी त्याचप्रमाणे नव्या सूर्यामालेतही एका ताऱयाभोवती ग्रह फिरत आहेत.पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही,मात्र नव्या सूर्यमालेत ‘केप्लर 90’नावाच्या ताऱयाभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना दिसत आहेत असे नासाने म्हटले आहे.ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून 2 हजार 545 प्रकाश वर्षे लांब असल्याची माहिती समोर आली आहे.